23 एप्रील 1873 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी-विजापुर, कर्नाटक येथे झाला. महर्षी वि.रा. शिंदे यांचा मराठी, संस्कृती व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी बी ए ची पदवी मिळविली.
Vitthal Ramji Shinde Mahiti in Marathi
महर्षी शिंदे यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशनेने शिक्षणाकरीता दरमहा 10 रु दिले.
1901 मध्ये मुंबईतील प्रार्थना समाज व कलकत्यातील ब्राम्हो समाज यांच्या साह्याने इग्लंड कधील मॅनचेस्टर येथे धर्म शिक्षाणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेले.
1905 साली महर्षी शिंदे यांनी पुणे येथे धर्म शिक्षणाची अभ्यास करण्यासाठी ते गेले. 1905 साली महर्षी शिंदे यांनी पुण येथे अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
16 ऑक्टोंबर 1906 वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्येचे निर्मूलन करण्यासाठी “ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन'” ची स्थापना केली.
महर्षी वि. रा. शिंदे जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी व सबजेक्ट ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव होता.
२५ मे 1916 रोजी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर त्यांनी चर्चसत्र चालविले होते.
1911 मध्ये मुरळी सोडण्याच्या पद्धतीचे विरोधामध्ये त्यांनी प्रतिबंधक परीषद बोलावली. महर्षी शिंदे यांनी मुरळी सोडणे या प्रथेचा विरोध केला. 1917 मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेचे पार पडलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या महीला अध्यक्ष म्हणुन ॲनी बेक्ष्रट यांची निवड झाली.
या अधिवेशनामध्ये “अस्पृश्यता पाळु नये” असा ठराव पास करुन घेण्यामध्ये शिंदे याचे मोलाचे योगदान आहे. 1920 मध्ये नागपुर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परीषद बोलावली.
महर्षी वि. रा. शिंदे यांची ग्रंथ संपदा :
- अनटचेबल इंडिया
- भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न – १९३३
- माझ्या आठवणी व अनुभव ( आत्मचरित्र्य )
- मराठी भाषीक व कानडी भाषाीक संबंध लेख
- भागवत धर्माचा विकास हा महत्वपुर्ण लेख