Home Marathi Grammar वाक्यप्रचार – मराठी व्याकरण

वाक्यप्रचार – मराठी व्याकरण

0
वाक् प्रचार हा शब्दसमुह असतो व तो  वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक् प्रचाराच्या शेवटी शक्यतो क्रियापद असते. अशा क्रियापदात मात्र काळानुसार बदल केले जातात. म्हणींच्या शेवटी शक्यतो क्रियापद नसते.

शब्दसमुह :

हात झाडून मोकळे होणे
जबाबदरी अंगाबाहेर टाकणे किंवा मोकळे होणे
मिशीवर ताव मारणे
बढाई मारणे
माशा मारणे
कोणताही उद्योग न करणे
मान ताठ ठेवणे
स्वाभिमानाने वागणे
मनात मांडे खाणे
व्यर्थ मनोराज्य करणे
भारून टाकणे
पूर्णपणे माहून टाकणे
भान नसणे
जाणीव नसणे
भगीरथ प्रयत्न करणे
चिकाटीणे प्रयत्न करणे
बोला फुलाला गाठ पडणे
दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे
बोळ्याने दुध पिणे
बुध्दिहिन असणे
बोल लावणे
दोष देणे
बोटावर नाचवणे
आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
बोचणी लागणे
एखदी गोष्ट मनाला लागून राहणे
बेत हाणून पाडणे
बेत सिद्धीला जाउ न देणे
बुचकाळ्यात पडणे
गोंधळून जाणे
बत्तिशी रंगवणे
जोरात थोबाडात मारणे
बादरायण संबंध असणे
ओढून ताणून लावलेला संबंध असणे
बारा वाजणे
पुर्ण नाश होणे
बभ्रा करणे
बोभाटा करणे, सगळिकडे प्रसिध्द करणे
बट्ट्याबोळ होणे
विचका होणे
फुटाण्यासारखे उडणे
पटकण राग येणे
फाटे फोडणे
उगाच अडचणी निर्माण करणे
प्राणावर उदार होणे
जिवाची पर्वा न करणे
प्राण कानात गोळा करणे
ऐकण्यासठी अतिशय उत्सुक होणे
प्रश्नांची सरबत्ती करणे
एकसारखे प्रश्न विचारणे
हूल देणे
चकवणे
हातावर शिर घेणे
जिवावर उदार होणे, प्राणांचीही पर्वा न करणे
हाताला हात लावणे
थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातात कंकण बांधणे
प्रतिज्ञा करणे
हातापाया पडणे
गयावया करणे
सर्वस्व पणाला लावणे
सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
साखर पेरणे
गोड गोड बोलून आपलेसे करणे
सामोरे जाणे
निधड्या छातीने संकटास तोंड देणे
साक्षर होणे
लिहता वाचता येणे
साक्षात्कार होणे
आत्मिक ज्ञान प्राप्त होणे, खरे स्वरूप कळणे
सुताने स्वर्गाला जाणे
संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाण्यास प्रयत्न करणे
सूतोवाच करणे
पुढे घडणाऱ्या गोष्टीचा प्रस्तावा करणे
 सोन्याचे दिवस येणे
अतिशय चांगले दिवस येणे
संधान बांधणे
जवळीक निर्माण करणे
संभ्रमात पडणे
गोंधळात पडणे
स्वप्न भंगणे
मनातील विचार कृतीत येणे
स्वर्ग दोन बोटे उरणे
आनंदाने-गर्वाने अतिशय फुलून जाणे
हट्टाला पेटणे
मुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरी येणे
 जोराने भांडू लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढवणे
खोटी स्तुती करूण माठेपणा देणे
हसता हसता पुरेवाट होणे
अनावर हसू येणे
हस्तगत करणे
ताब्यात येणे
हातपाय गळणे
धिर सुटणे
 हाताचा मळ असणे
सहज शक्य असणे
हात ओला होणे
फायदा देणे
हात टेकणे
नाइलाज झाल्याने माघार घेणे
हात देणे
मदत करणे
हात मारणे
ताव मारणे,भरपूर खाणे
हाय खाणे
धास्ती घेणे
हात चोळणे
चरफेडणे
हातावर तुरी देणे
डोक्यांदेखत फसवून निसटून जाणे
हात हालवत परत येणे
काम न होता परत येणे
हात झाडून मोकळा हांणे
जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे
मधुन विस्तव न जाणे
अतिशय वैर असणे
मूग गिळणे
उत्तर न देता गप्प राहणे
मधाचे न बोट लावणे
आशा दाखवणे
मनात घर करणे
मनात कायमचे राहणे
मन मोकळे करणे
सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणेंनसने घेणे
मन साशंक हाणे
मनात संशय वाटू लागणे
मनावर ठसणे
मनावर जोरदारपणे बिंबणे
मशागत करणे
मेहनत करून निगा राखणे
माञा चालवणे
योग्य परिणाम होणे
रत्काचे पाणी करणे
अतिशय मेहनत करणे
राईचा पर्वत करणे
क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
राख होणे
पूर्णपणे नष्ट होणे
राब राब रागणे
सतत खूप मेहनत करणे
राम नसणे
अर्थ नसणे
राम म्हणणे
शेवट होणे,मृत्यू येणे
लष्कराच्या भाकया भाजणे
दुसयांच्या उठाठेवी करणे
लहान तोंडी मोठा घास घेणे
आपणांस न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे
लक्ष वेधून घेणे
लक्ष वेधून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणे
लक्ष्मीची कृपा असणे , श्रीमंती असणे
लौकिक मिळवणे
सर्वत्र मान मिळवणे
वकीलपत्र घेणे
एखाधाची बाजू घेणे
वाट लावणे
विल्हेवाट लावणे,मोडूनतोडून टाकणे
वाटाण्याच्या अक्षता लावणे
स्पष्टपणे नाकारणे
वठणीवर आणणे
ताळ्यावर आणणे
वणवण भटकणे
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी
वाचा बसणे
एक शब्दही बोलता न येणे
विचलित होणे
तनाची चलबिचल होणे
विसंवाद असणे
एकमेकांशीन जमणे
वड्याचे तेल वांग्यावर काढणे
एकाचा राग दुसऱ्यावर काढणे
विडा उचलणे
निश्र्चय  किंवा प्रतिज्ञा करणे
वेड घेऊन पेडगावला जाणे
मुद्दाम ढोंग करणे
शब्द जमिनीवर पडू न देणे
दुसयाच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
शहानिशा करणे
एखाधा गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
शिगेला पोचणे
शेवटच्या टोकाला जाणे
शंभर वर्षे भरणे
नाश होण्याची वेळ येणे
श्रीगणेशा करणे
आरंभ करणे
सहीसलामत सुटणे
दोष न देता सुटका होणे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here