Home MPSCKida News आता येणार सर्वसामान्याना अच्छे दिन. मोदी सरकार घेणार पेट्रोल – डिझेलच्या दरात...

आता येणार सर्वसामान्याना अच्छे दिन. मोदी सरकार घेणार पेट्रोल – डिझेलच्या दरात हा मोठा निर्णय?

0

होय हे, वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण हे खरे आहे. मोदी सरकार पेट्रोल व डिझेल च्या किमती निम्म्याहून कमी करण्याच्या विचारात आहे. याचे कारण असे की देशभरातील सर्व उत्पादन व सेवा या जीएसटी कक्षेच्या अंतर्गत येतात. परंतु पेट्रोलियम पदार्थ हे जीएसटी कक्षेमध्ये येत नाहीत.

जीएसटी कौन्सिल लखनऊ मध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वसामान्यांचे लक्ष.

मोदी सरकार अच्छे दिन म्हणत सत्तेवर विराजमान झाले. बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार या स्लोगनने नरेंद्र मोदी यांनी सत्तेला चार चांद लावले. परंतु मोदी सरकार येऊनही आज सात वर्ष पुर्ण झाले पंरतु महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही.

हाच जनतेचा रोष कमी करण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोदी सरकार पेट्रोल व डिझेल चे भाव कमी करून जनतेतील रोष कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री व जीएसटी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे, याच कौन्सिलमध्ये पेट्रोलियम पदार्थ जीएसटी च्या कक्षेत आणण्यासाठी विचारविनिमय केला जाणार आहे.

जर जीएसटी च्या कक्षेमध्ये पेट्रोल व डिझेल आले तर केंद्र शासन व राज्य शासनाला खूप मोठ्या महसूल नुकसानानीचा सामना करावा लागू शकतो पेट्रोल व डिझेल हजारो कोटी चा महसुली फायदा होतो.

पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून उत्तर प्रदेश च्या निवडणुकी ची तयारी सुरू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटी कौन्सिल च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत.

उत्तर प्रदेश च्या निवडणुकीमध्ये भाजपा नवीन मुद्दा शोधत आहे. पेट्रोल डिझेल च्या दरात कपात करून मोदी सरकार पुन्हा योगी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here