महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण माहिती

0
महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा ज्योतिबा  फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 (11एप्रिल – राष्ट्रीयशिक्षक हक्क दिन) रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांचे मुळगाव सातारा जिल्हयातील”कटगुण” हे होते. महात्मा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे नाव “चिमणाबाई” होते तर आजोबांचे नाव “शेरीबा” हे होते. ज्योतिबा हे 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यु झाला नंतर ज्योतिबाचा संभाळ त्यांची आत्या “सगुणबाई” यांनी केली. ज्योतिबांचे मूळ आडनाव “गोऱ्हे” हे होते. ज्योतीबांच्या आजोबांचे फुलांचा व्यवसायहोता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहून फुले असे झाले. ज्योतीबाहे जातीने क्षत्रिय माळी समाजाचे होते.

सार्वजनिक काका व रा. गो. भंडारकर हे ज्योतीबा  फुलेंचे वर्ग मित्र होते. 1834 ते 1838 मध्ये ज्योतीबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले. ज्योतीबा फुल्यांच्या वडिलांच्या कारकूनामुळे ज्योतिबांस शिक्षणापासून वंचित रहावे लागले. 1840 मध्ये वयाच्या 13 व्य वर्षी त्यांच्या विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे (झगडे पाटील) यांच्या कन्या “सावित्रीबाई” यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 03 जानेवारी  1831 रोजी सातारा जिल्ह्यातील “नायकगाव” येथे झाला. 03 जानेवारी हा दिवस राज्यामध्ये “राज्य स्री मुक्ती दिन” म्हणून साजरा केला जातो.

03 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जि. सातारा येथील घर “राष्ट्रीय स्मारक” म्हणून घोषित केले आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत. महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई यांचे शिक्षण “नॉर्मल स्कुल” या शाळेत  झाले त्यांचे शिक्षक “यशवंतराय परांजपे” हे होते. सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये “काव्यफुले” तर 1892 मध्ये “बावनकशी” व “सुबोध रत्नाकर” काव्यसंग्रह लिहले. ज्योतिबांची चिंतन शिलता व बॊद्धिक कॊशल्य पाहून शेजारी राहणारे उर्द शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतीबांना खाजगी स्कोटीश मिशनीरीच्या शाळेत प्रवेश घेतला.

संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास ज्योतीबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतिबांची मैत्री सदाशीव बल्लाळ  गोवंडे या ब्राहमण मुलाशी झाली. फुले बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरी बद्दल चिड होती. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याच्या  उद्देशाने 1847 मध्ये ज्योतीबांनी लहुजी उस्ताद मांग-साळवे या पेहलवानांकडून नेमबाजी व दांडपट्याचे प्रशिक्षण घेतले होत. पंरतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांनी दिसून आला. फुले यांच्यावर संस्कृत मधील वर्जसुच व कबीरांच्या “विप्रमती” या  ग्रँथातील कांही भागांचा  प्रभाव होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व  मार्टिग ल्युथर   किंग यांच्या पासून अन्यायाविरुद्व लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली.

1847 मध्ये “थॉमस पेन” यांच्या “राईट्स ऑफ  मॅन. या  पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन यांची इतर पुस्तके – जस्टीस अँड हुम्यानीटी, कॉमनसेन्स,एज ऑफ रीजन व राईट्स ऑफ मॅन 1848 मध्ये ब्राम्हण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा ब्राम्हणांनी त्यांचा अपमान केला होता. हा प्रसंग त्यांचा जिवनास कलाटणी देणारा ठरला.

03 ऑगास्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतीबांना देशातील पहीली मूलींची शाळा सुरू केली. स्वतंत्रपणे मुलींची शाळा करणारे ज्योतीबा हे पहीले समाजसुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेच्या प्रेरणा अहमदपगरच्या स्कॉटीश शाळेच्या शिक्षीका “मिस फरार” यांच्या कडून ज्योतीबांनी घेतली.

3 जुलै 1851 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ मध्ये अण्णासाहेब चिपळुणकर यांच्या वाडयात मूलींची दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1852 रोजी पुण्यातील बुधवार रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा ज्योतीबांनी सुरू केली. 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठ मध्ये मूलींची चौथी शाळा ज्योतीबांनी सुरू केली.

महात्मा फुले यांचे म्हत्वाचे कार्य :

19 मे 1852 रोजी पुण्यातील “वेताळ पेठ” येथे ज्योतीबानी अस्पृश्य मूलांच्या शिक्षणासाठी पहीली शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1852 रोजी त्योतीबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थपना केली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीपन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटीश सरकारचे वतीने पुण्यातील विश्रामबाग वाडयात ज्योतीबांचा विशेष सत्कार केला.

10 सप्टेंबर 1853 रोजी “महार, मागं,चांगार इ. लोकांस विद्या शिकविणारी मंडळी” या नावाची संस्था ज्योतीबांनी सूरू केली. लोकांना शिकविण्याकरीता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदरची संस्था चालु करण्यात आली होती. या संस्थेमार्फत 1858 पर्यंत 3 शाळा स्थापन करण्यात आल्या. ब्रिटीशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी “दक्षिणा प्राईज फंड” च्या साह्याने दरमहा २५ रू प्रमाणे मदत केली.

1855 मध्ये ज्योतीबांनी “तृतीय रत्न” हे नाटक लिहीले. ब्राम्हण लोक शुद्रांची कशी फसवणुक करतात हे त्यांनी सप्रमान या नाटकातुन दाखवुन दिले. 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतीबांनी पहीला पुर्नविवाह घडवुन आणला. 1863  मध्ये ज्योतीबा फुलेंनी स्वत:च्या घरीच भारतातील पहीले ” बालहत्या प्रतिबंधक गृह” स्थापन केले व नंतर पंढरपुर येथेही ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. निपुत्रीक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राम्हण विद्धवेचा “यशवंत” हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले. 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत “शेरवी” जातीतला “पहीला विधवा पुर्निविवाह” ज्योतीबांनी घडवुन आणला. 1865 मध्ये देशातील विधवांच्या केस रोपनाच्या प्रथेला विरोध करण्याकरीता ज्योतीबांनी पुण्यातील “तळेगाव ढमढेरे” व “ओतुर” येथे “न्हावीकांचा संप” घडवुन आणला.

1867 मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिणोंद्धार करण्याचे महत्वपुर्ण काम ज्योतीबांनी केले. ज्योतीबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरीता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठविले होते, पंरतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी बनले. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतीबांनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद खूला केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here