Home History महादेव गोविंद रानडे (1842-1909) यांच्याबद्दल माहिती

महादेव गोविंद रानडे (1842-1909) यांच्याबद्दल माहिती

0

समाजसुधार – न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे

न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवरी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील “निफाड” या गावी झाला. रानडे यांच्या वडीलांचे नाव गोविंद व आईचे ना गोपीकाबाई होते. न्या. रानडे यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथेा पुर्ण केले.

1856 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते मुंबईतील एल्फिस्टलन कॉलेज मध्ये गेले. 1862 मध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयामध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले. याच वर्षी “इंदुप्रकाश” या वृत्तमान पत्राचे संपादकपद न्या. रानडे यांच्याकडे आले.

1865 मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “विधवा विवाह उत्तेजक मंडळी” नावाची संस्था स्थापन केली. ( 1893 रोजी महर्षी कर्वे यांनी पुणे येथे “विधवा उत्तेजक मंडळी” या नावाने संस्था स्थापन केली.)

1866 साली मुंबई विद्यापीठाचे “पहिले भारतीय फेलो” म्हणुन ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची नेमणुक केली होती. एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये वे इतिहास व इंग्रजी विषय शिकवु लागले.

1871 मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामध्ये न्या. रानडे यांनी महत्वपर्ण भुमिका बजावली होती. 31मार्च 1873 रोजी न्या. रानडे, आत्मारामा पांडुरंग, डॉ. रा. गो. भंडारकर इ. मंडळींनी मिळुन मुंबई येथे “प्रार्थना समाज” या संस्थेची स्थापना केली. तसेच ” भारतीय सामाजिक परीषद” या महत्वपुर्ण संस्थेची स्थापना न्या. रानडे यांनी केली होती.

न्या. रानडे यांच्याविषयी महत्वाची माहिती :-

11 मे 1878 रोजी पुणे मधील हिराबाग येथे न्या. रानडे यांच्या पुढाकाराने देशातील पहीले साहित्य संमेलन भरविण्यात आले. या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न्या. महादेव गोविंद नानडे यांनीच भुषविले.

1855 मध्ये दुसरे साहित्य संमेलन पुणे येथेच भरविण्यात आले होते. व मे १९०५ मध्ये ०३ रे साहित्य संमेलन सातारा येथे भरविण्यात आले. या ०३ ऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद र. गो. करंदिकर यांनी भुषविले होते.

1885 मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांना मुंबई कायदे काऊन्सीलवर कायद्याचे सल्लागार म्हणुन नियुक्त केले. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ही त्यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.

1885 मध्ये त्यांनी सामाजिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले व 1890 मध्ये त्यांनी औद्योगिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. त्यांना “हिंदी” अर्थशास्त्राचा जनक” असे ओळखले जाते. भारताच्या स्वांतंत्र पुर्व काळातील मवाळवादी विचारसरणीचे प्रमुख नेते म्हणुन न्या. रानडे यांना ओळखले जाते.

देशामध्ये विवीध न्यायालायांमध्ये न्या. रानडे यांनी न्यायाधिश म्हणुन काम केले होते. 1993 मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची मुंबई उच्च न्यायालायाचे उच्च न्यायाधिश म्हणुन नेमणुक केली होती.

न्या. रानडे यांनी त्यांच्या जिवन काळात वृत्कृत्तोजक सभेची स्थापना केली. तसेच त्यांनी पुणे येथे “नेटिवह जनरल लॅयब्ररी” ची स्थापना केली. न्या रानडे यांनी पुणे येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

न्या. रानडे यांनी “द राईज ऑफ मराठा पॉवर” (मराठी सत्तेचा उदय) हा महत्वपुर्ण ग्रंथ लिहीली. तसेच त्यांनी ” ॲस्से इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे ” हा अर्थशास्त्र विषय ग्रंथही लिहीला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here