Home History 1942 च्या क्रिप्स योजने बद्दल माहिती

1942 च्या क्रिप्स योजने बद्दल माहिती

0
MPSC History

क्रिप्स योजनेची पार्श्र्वभूमी:

1942 साली जपानने इंग्रजांच्या ताब्यातील 2 प्रदेश सिंगामूर व रंगून जिंकल्याने या घटनेपासूनच इंग्रजांना सहेबाबत चिंता वाटू लागली.

म्हणून इंग्लंड च्या पंतप्रधानाने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांच्याकडे मदत मागितली.

रूझेल्ट याने या युध्दात भारताची मदत घेण्यासाठी इंग्रजांकडे आग्रह धरला.

रूझवेल्टच्या आग्रहावरून भारतासोबत पुढील वाटाघाटीसाठी इंग्लंडच्या पंतप्रधानाकडे सर स्टॅम्फर्ड क्रिप्स यांच्या नितृत्वाखाली क्रिप्स योजना भारतात पाठवली.

29 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना भारतात जाहिर करण्यात आली.

क्रिप्स योजनेच्या तरतूदी:

भारतात लवकरच वसाहतीचे स्वराज्य देउ.

भारताला वरकरच संघराज्याची निर्मिती करू.

या संघराज्यात प्रांत व स्थानिकांना सहभागी होण्यासाठी स्वयनिर्णयाचा अधिकार असेल.

दुसऱ्या महायुध्दाच्या समाप्तीनंतर घटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात येईल.

युध्द चालू असेपर्यंत युध्दखाते सोडून सर्व खाती भारतीयांकडे असतील.

यासाठी भारताने जपान बरोबरच्या युध्दांत इंग्लंडला सहकार्य करावे.

क्रिप्स योजनेचा परिणाम :

प्रांतात व स्थानिकांना स्वरिर्णयाचा अधिकार दिल्याने देशात फूट पडण्याची शक्यता होती.

म्हणून गांधिसहित राष्ट्रीय कॉंग्रेसने ही योजना फेटाळली होती.

या योजनेबद्दल गांधिजींचे मत ‘ही योजना म्हणजे बुडत्या बॅंकेचा पुढील तारीखेचा चेक होय.’

इंग्रजांना सहकार्य करू इच्छिणाऱ्यां जीनाने या योजनेत स्वतंत्र पाकचा उल्लेख नसल्याने मुस्लिम लिगच्या वतीने हि योजना फेटाळून लावली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here