भारतीय राज्यघटनेची निर्मिती व पार्श्वभूमी माहिती

0
MPSC History

Bhartiy Rajyaghatne baddal mahti marthi

भारताला पर्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. भारतीय राज्यघटनेची निर्मिती घटना समितीव्दारे करण्यात आली.

घटना समिती संकल्पना सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. 1940 च्या आ‍ॅगष्ट आ‍ॅफर मध्ये दुसरे महायुध्द संपल्यानंतर घटना परिषद निर्माण करण्यात येईल असे ब्रिटीश सरकारने जाहिर केले.

1942 च्या क्रिप्स मिशनमध्ये दुसरे महायुध्द संपल्यानंतर घटना समिती स्थापण्याची तरतूद होती. 1946 मध्येे भारताला लवकच स्वातंत्र्य देण्याची घोेषणा मंजूर पक्षाचे ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंंट अ‍ॅटली यांनी केली. कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापण करण्यात आली.

घटना समिती निर्मिती :

11 डिसेम्बर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीचे सुरुवातीचे सभासद 389 प्रांताचे 292 आणि संस्थानांचे 93 सदस्य होते. 4 सदस्य चिप कमिशनर प्रांताचे होते.

घटना समितीचे शेवटपर्यंतचे सभासद 207. घटना निर्मितीची सुरुवात 29 ऑगस्ट 1946 घटना समितीच्या एकूण 12 उपसमित्या होत्या.

घटनेच्या उदिष्ठांचा ठराव 13 डिसेम्बर 1946 रोजी नेहरूंनी मांडला. 10 जानेवारी 1946 रोजी नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 22 जानेवारी 1947 रोजी उदिष्ठचा ठराव पास करण्यात आला. मसुदा समिती 19 ऑगस्ट 1947 रोजी नेमली गेली.

  • घटना निर्मिती साठी लागलेला कालावधी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
  • घटना निर्मितीत लागलेला एकूण खर्च 63 लाख 96 हजार 729 रुपये.
  • 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्ण झाली
  • 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना संमत केली गेली.
  • 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली.
  • 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा /संविधान दिवस म्हणून पाळला जातो.
  • घटना समितीची एकूण अकरा अधिवेशने झाली.
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात.
  • घटना समितीचे कायदा सल्लागार बी एन राव हे होते.
  • बी एन राव यांनी म्यानमार ची घटना निर्माण करण्यासाठी देखील सहाय्य केले होते.

घटना समितीचे महत्त्वाचे सदस्य पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, हृदयनाथ कुंजरू, अब्दुल कलाम आजाद, के एम मुंशी, गोविंद वल्लभपंत, आचार्य कृपलानी, एम आर मसानी, b.g. खेर, रत्नाप्पा कुंभार, पंजाबराव देशमुख, गवा मावळकर, एस राधाकृष्णन, एच एस सुहावरती, डॉ बाबासाहेब आंबेडकर, हंसाबेन मेहता, रेणुका रे, सरोजिनी नायडू, एम वर्धा, के टी शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here