Home History दादोबा पांडुरंग तर्खडकर संपूर्ण माहिती

दादोबा पांडुरंग तर्खडकर संपूर्ण माहिती

0
MPSC History

09 मे 1814 रोजी दादोबा पांडुरंग तर्खडकर मुंबई येथे यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ गाव ठाणे जिल्हयाील वसई जवळीत तर्खड हे होते. तर्खडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पार पडले.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल माहिती

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी शिक्षण सुरु असतानाच त्यांनी “मराठी भाषेचे व्याकरण” हे महत्वपुर्ण पुस्तक लिहीले. प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग हे दादोबा तर्खडकरांचे मोठे बंधु होते. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते.

1837 मध्ये नोकरी साठी माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणुन काम केले. या दरम्यान त्यांनी पारशी भाषेची अभ्यास केला.

1844 मध्ये तर्खडकरानी सुरत येथे “मानवधर्म सभा” व 1848 मध्ये “ज्ञानप्रसारक सभा” या सभांची स्थापना केली. 1857 च्या उठावाचेवेळी नोकरी च्या निमीत्ताने अहमदनगर येथे असताना तर्खडकरांनी तेथील भिल्ल जातीच्या लोकांचे बंड त्यांनी मोडून काढले. त्याच्या या महत्वपुर्ण कामगिरी बद्दल ब्रिटीश सरकारने त्यांना रावबहादुर” ही पदवी दिली.

तर्खडकर यांना “मराठी भाषेची पाणिनी” म्हणुन ओळखले जाते. तर विष्‍णु शास्त्री चिपळुणकर यांना “मराठी भाषेचे शिवाजी” म्हणुन ओळखले जाते.

मोरोपंताच्या “केकावली” या ग्रंथावर टिका करण्याकरीता तर्खडकरांनी लिहीलेला “यशोदा पांडुरंग” हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समिक्षेची सुरुवात होय.

“चरित्र व आत्मचरित्र” हे दादोबा पांडुरंगा यांचे आत्मचरित्र आहे. तर्खडकरांचे आत्मचरित्र त्यांचे मृत्युनंतर 1947 मध्ये प्रकाशित झाले.

22 जुन 1844 रोजी त्यांनी “मानवधर्म सभा” स्थापन केली. तसेच त्यांनी 1849 मध्ये “परमहंस सभा ची स्थापना केली.

1848 मध्ये मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन करुन त्याचे अध्यक्षपद दादोबांना दिले. मराठी भाषेतील पहीली कादंबरी “यमुना पर्यटन” ही बाबा पद्मजी यांनी लिहली. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुर्नविवाह विषयक संस्कृत लेख लिहीला.

तर्खडकरांची ग्रंथ संपदा :

  • मराठी भाषेचे व्याकरण
  • मराठी नकाशांचे पुस्तक
  • विद्येच्या लाभाविषयी.
  • यशोदा पांडुरंग
  • शिशिबोध
  • मराठी लघु व्याकरण
  • धर्म विवेचन
  • परमहंसीक ब्राह्मण धर्म

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here