Friday, July 30, 2021

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल माहिती

समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल माहिती

समाज सुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला.
आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही, हे तत्व त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यांचा जन्म 9 मे 1814 मुंबई येथे झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काहि काळ जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणूनही ते नियुक्त होते. त्यानंरत सुरत येथे एल्फिन्सटन संस्थेत शिक्षक म्हणूनही काम केले. 1846 ला त्यांची ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाली.
1852 मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडांचा यशस्वी बीमोड केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून कार्य केले. दादोबांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ हि पदवी दिली.

Dadoba Pandurang Tarkhadkar information in marathi

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा

मानवर्धन सभा, 1844 दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्यांने दादोबांनी समाजातील दोष व उणीवा दूर करण्यासाठी सुरत येथे हि संस्था स्थापन केले. कर्यकर्त्यांच्या अभावामुळे हि संस्था लवकरच बंद पडली.
परमहंस सभा, 1848  ला मुंबई येथे स्थापन करण्यात आली. भिकोबा चव्हान, राम बाळकृष्ण जयकर यांच्या सहकार्याने परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत होते.
दादोबा पांडुरंग यांच्या ग्रथसंपदेबाबतीत त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण, विद्देच्या लाभाविषयी, पारमहांसिक ब्राह्मधर्म, धर्मविविचन, यशोदा पांडूरंग.
मराठी भाषेचे व्याकरणकार व गाढे विव्दवान असलेले दादोबा ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 17 आ‍ॅक्टोबर 1882 ला झाला.

Marathi Bhasheche Panini dadoba pndurang tarkhadkar

mpsckida
MPSCKida owner is a professional content writer. I am sharing with you my experience while studying. I always like to write articles for readers.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
2,875FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles