क्ष-किरण बद्दल संपूर्ण माहिती

0
15
क्ष-किाणांचा शोध लावणारे क्ष-किरणांचे जनक – विल्यम के. रॉटजेन (Rontegen) इ. स. 1895 मध्ये लावला. कॅथोड किरण ज्यावेळी एखाद्या वस्तूवर आदळून एकदम रोखले जातात त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनच्या गतिज उर्जेत मोठा भाग उष्णतेत रूपांतरीत होतो आणि उर्वरित अल्प भागांचे रूपांतर क्ष किरणांने होते.

X-RAY MPSC Study in Marathi

x-ray new image mpsckida

क्ष किरणांचे गुणधर्म –

 1. क्ष किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी असणारे विद्द्युत चुबकिय तरंग होत. अतिशूक्ष्म तरंग लांबीमुळे क्ष किरण अदृष्य असतात.
 2. दृष्य प्रकाशाचे सरळ रेषेणे प्रसारण, परावर्तन, अपवर्तन इत्यादी सर्व गुणधर्म क्ष किरणांमध्ये आढळून येतात.
 3. क्ष किरणांचा हे विदयुत चुबकिय तरंग असल्याने त्यांचा वेग प्रकाशाच्या विगाएवढा असतो.
 4. क्ष किरण हे विद्युत प्रभारीत नाहीत.
 5. वायूतून जाताना क्ष किरण त्यांचे आयनन घडवून आणतात.
 6. छायाचित्रण काचेवर क्ष किरण परिणाम घडवून आणतात.
 7. झिंक सल्फाईड, बेरियम प्लॅटिनोसायनाईड या प्रतिदिप्तशील या पदार्थावर क्ष किरण प्रतिदिप्ती निर्माण करतो.
 8. क्ष किरणांतील प्रचंड ऊर्जेमुळे ते कागद, लाकूड कमी वस्तूमानांक असलेले धातूचे पातळे पत्रे भेटून जातात परंतु लोखंड शिसे इत्यादी घट्ट पदार्थांना भेटू शकत नाहीत.

क्ष किरणांचे उपयोग – 

 1. मानवी शरिराचे छायाचित्रण करून हाड मोडल्याचे निदान शरिरात गेलेल्या अथवा दडवलेल्या वस्तूची जागा निश्चित करण्यास क्ष किरण उपयोगात आणतात.
 2. क्ष किरणांमुळे जिवंत पेशींचा नाश होतो. त्यामुळे त्वचारोग नाहीसे करण्यासाठी आणि शरिरातील खोलवर असलेल्या घातकी गाठी नष्ट करण्यासाठी क्ष किरण वापरतात. 
 3. आद्योगिक क्षेत्रात क्ष किरणांनी ओतीव (Casting) वस्तुमधील किंवा जोड कामातील (Welding) दोष शोधून काढता येतात.
 4. अस्सल हिरे आणि नकली हीरे यांच्यातील फरक क्ष किरणांच्या सहाय्याने आळखतात.
 5. सोने, चांदी वगैरे मुल्यवान धातुची तस्करी शोधून काढण्यासाठी तसेच स्फोटके मादक पदार्थ शोधून काढण्यसाठी क्ष किरणांचा उपयोग केला जातो.
 6. स्फटिकामधील अणुंच्या संरचणेचा अभ्यास करण्यासाठी क्ष किरणांचा उपयोग होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here