सत्यशोधक समाज माहिती

0
18
महात्मा फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रात धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळींना सुरूवात झाली. या चळवळीचे रूप व्यापक होऊ लागले. संघटनात्मक मार्गाने धर्म सुधारनांचे कर्य होऊ लागले. महात्मा फुले यांनी  सामाजीक सुधारण चळवळीस व्यापा रुप देण्यासाठी शूद्र व अतिशूद्रांची सर्वांगीन स्थिती  सुधारण्यासाठी, व त्यांचा ग्रामिण भागात प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्टे होते. सर्व जाती धर्मातील लोकांना सत्यशोधक समाजात प्रवेश होता. या समाजाच्या मार्फत एक प्रभावी संघटना निर्माण उभी करून विरष्ठ वर्गाविरूध्द व्यापक संघर्ष करणे हाच महात्मा फुले यांचा हेतू होता.

सत्यशोधक समाजाबद्दल संपूर्ण माहिती

satyashodhak samaj image

सत्यशोधक समाजाची तत्त्व –

  1. ईश्वर एकच असुन तो निर्गुण व निराकार आहे.
  2. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
  3. परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे.
  4. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरूरी नसते त्याचप्रमाने परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही.
  5. मानवाला जातीमुळे नाही तर श्रेष्ठत्व प्राप्त होते.
  6. पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी आज्ञानमुलक आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणूकिचे कारण आहेत.
  7. कोणताही धर्मग्रंथ इश्वरनिर्मित नाही. सर्व धर्माची निर्मिती मानवानेच केली आहे.
सत्यशोधक समाजाला सुधारणेच्या चळवळीस अतिशय महत्व आहे. या समाजाने लोकांना स्वाभाीमान बनवण्याचे काम केले. इ. स. 1911 नंतर राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाताचे पुनरूज्जीवीन केले. त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहाने महाराष्ट्रात पढे सत्यशोधक समाजाचा मोठा प्रसार झाला. सत्यशोधक समाजाचा प्रचारासाठी कृष्णराव भालेराव यांनी दिनबंधू हे साप्ताहिक चालवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here