शहाजीराजे भोसले

0
13
शहाजी राजांचा जन्म वेरूळच्या भोसले कुटूंबात इ. स. 1594 मध्ये झाला. त्याच्या आईचे नाव उमाबाई व वडिलांचे नाव मालोजीराजे होते. मालोजीराव निजामशाहीच्या दरबारात पाचहजारी मनसबदार म्हणून काम करत होते. स्वामिनिष्ट राजांच्या कामगिरिबद्दल निजामशाहकडून त्यांना पुणे, सुपे, चाकण, व इंदापूर या परगण्यांची जहागिरी मिळाली. निजामशाहीच्या वतीने लढत असताना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले. त्यानंतर विठोजी भोसले, शहाजी व शरीफजी यांनी पुणे जहागिरीचा संभाळ केला. आपल्या पित्याप्रमाने शहाजींनी निजामशाहीची सेवा केली. निजामशाहावर चालूल आलेल्या मुघल व अदिलशाही फौजांना त्यांनी आ‍ॅक्टोबर 1624 मध्ये भातवाडीच्या लढाईत पराभव केला. या युध्दामुळे दक्षिणेच्या राजकारणात शहाजी राजांचा उदय झाला. कर्तबगार मराठा सरदार शहाजी राजे भोसले यांनी मुघल व अदिलशाही सत्तापासून वाचवण्याचा प्रमाणिकपणे प्रयन्त केला. 

शहाजी राजे भोसले यांच्या बद्दल माहिती

shahaji raje image mpsckida
इ. स. 1636 मध्ये निजामशाहीचा शोवट झाला. यानंतर शहाजीराजे अदिलशाहीत रूज झाले. पुणे, सुपे, चाकण व इंदापूर हि त्यांची मूळची जहागिर त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आली. त्याचबरोबर कर्नाटकातील बंगरूळमधील जहागिरीचा कारभार त्याच्याकडे सोपवण्यात आला. मराठी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तिथे स्वतंत्र राजदर्बार निर्माण केला. त्यांच्या पदरी विविध जाती-धर्माचे बहुविध भाषा जानणारे सुमारे 75 कवी व पंडित होते. शहाजिराजे स्वतः साहित्य संगित, कलादिकांच्या चर्चेत सहभागी होत असत. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असत. शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले. शिगोमा जिल्ह्यातील होदिगेरे या गावी 23 जानेवारी 1664 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. शहाजीराचे यांच्या ऐतिहासिक कामगिरिबद्दल इतिहासकारांनी त्यांना राज्यनिर्माता व राज्य संकल्पक म्हणून गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here