छत्रपती संभाजी महाराज

0
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी महाराज छत्रपती झाले. संभाजी महाराजांना सिद्दी, पोर्तूगिज व मोगल याच्याबरोबर सतत संघर्ष करावा लागला. मराठयांचे स्वातंत्र्य संपवण्यासाठी खुद औरंगजेब प्रचंड सैन्यानिश महाराष्ट्रात उतरला. छत्रपती संभाजी महाराजंच्या शौर्यामुळे शत्रूस फार माठी दहशत बसली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र या नात्याने छत्रपती पदावर संभाजीचा पुर्ण हक्क होता. परंतु रायगडावरील अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निरादी, मोरोपंत पिंगळे या प्रधानांनी त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हा युवराज संभाजीराजांनी विरोधकांचा बंदोबस्त करून छत्रपती पद मिळवले. प्रतिकूल परिस्थितीत पित्याविरूध्द बंड करणाऱ्या औरंगजेबचा पुत्र शहजादा अकबरास आश्रय देण्याचे धाडस संभाजी महाराजांनी दाखवले. त्यानंर अफाट फौज घेऊन खुद्द औरंगजेब मराठी राज्यावर चालून आला असता संभाजी महाराजांनी मोठया शौर्याने पंतिकार केला. त्यामुळे पहिल्या टप्यात औरंगजेबला माघार घ्यावी लागली. परिणमी इ. स. 1658 मध्ये मराठ्यासोबतच लढा थांबवून अदिलशाही व कुतूबशाही विरूध्द मोहिम हाती घेतली.

छत्रपती संभाती महाराज यांच्याबद्दल परिक्षनिहाय माहिती

sambhaji maharaj mahiti

छत्रपती संभाजी महाराजांच्या मदतीचा हात पुढे करून विजापूर व गोवळकोंडा राज्याला सर्व प्रकारची मदत केली, परंतु या दोन्ही पुघल सत्ता अवघ्या दोन वर्षात कोसळल्या. संभाजी महाराजांना आपल्या या नऊ वर्षाच्या कारकिर्दित स्वकीयांबरोबरच संघर्ष करावा लागला.
इ. स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे शेख निजामाने संभाजी महारज व कलश यांना पकडले. औरगजेब बादशाहाच्या आज्ञेने भीमा नदीच्या तीरावर वढू बुद्रुक येथे 11 मार्च 1689 रोजी उभयतांना अंत्यत क्रुरतेने ठार केले. छत्रपती संभाजी महाराजांचा आणखी एक उल्लेखनिय गुणविशेष म्हणजे ते संस्कृत चे पंडित होते. बुधभूषण या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांची काव्यालंकार, शास्त्रे, पुराणे, संबीत आणि धनुर्विद्या यांचा सखोल अभ्यास केला होता. संभाजी राजांनी बुधभूषण, नायिका, भेद, नखशिखसातसतक हे चार ग्रंथ लिहले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here