छत्रपती राजाराम महाराज

0
25
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यांनी जिंजीला राहून मोगलांविरूध्द लढा चालू ठेवला. या कामी संताजी-धानाजी या दोन सेनापतींनी मुघलांना जोरीस आणले. राजाराम महाराजांनी मराठा सरदारांना वतने दिली. परिणामतः मराठी राज्यात अनेक सत्ताकेद्रे उदयास आली.

राजाराम महाराज यांचा इतिहास मराठीत

Rajaram maharaj image for mpsc

स्वराज्यातीन ठाणी शत्रूच्या हाती भराभर पडत होती. राजधानी रायगडला वेढा पडला असताना राजाराम महाराजांनी कर्नाटाकात जिंजीलाराहून मोगलांविरुध्द लढा चालू ठेवला. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण या दोन प्रधानांकडे महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार सोपवला तसेच त्यांना निर्णयस्वातंत्र्य दिले. राजाराम महाराजांच्या कार्यकाळात संताजी घोरपडे व धानाजी जाधव या सेनानींनी मोघल पक्षाकडील अलीमर्दानखान, इस्माइलखान, शेख निजाम, जाननिसखान, इस्माइलखान सर्जाखान, तहब्बुरखान अशा नामांकित सरदारांना पराभूत करून सळो कि पळो करून सोडले होते.
असे समजतात कि मोगल सेनानीस भितीने कापे भरे. राजाराम महाराजांच्या कार्याकळात कर्तबगार मराठयांनी औरंगजेबकडून स्वराज्याचा मोठा हिस्सा परत जिंकून घेतला. एवढेच न्हवे तर नर्मदा ओलांडून माळव्यात लष्करी धामधूम माजाविली. राजाराम महाराजांनी मराठा सरदारांना वतने व जहागिऱ्या दिल्या. इ. स. 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here