महात्मा जोतीबा फुले इ. स. 1827 ते 1890

0
20
महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. जोतीबांचे आजोबा पुण्यात स्थानिक झाले. आपल्या उदयनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यावसाय सुरू केला. त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमनबाई असे होते. महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले. 

इ. स. 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेह रोवली. इ. स. 1852 मध्ये त्यांनी दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली. त्यातुनच त्यांनी इ. स. 1864 मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडून आनला. विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेउन फुलेंनी समाजक्रांतीस प्रेरणा दिली. त्यानी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.
mahatma phule jayanti nibandh marathi
सावित्रीबाई फुले यांनी यात राहणाऱ्या मुलांची देखभाल केली. अस्पृश्यता हा मानव समाजातील कलंक आहे असे ते मानत. अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला ठेवला.
केशवपन, बालहत्या, बालविवाह व अस्पृश्यता निवारण या विषयांवर समाज प्रबोधन केले. विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इ. स. 1833 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. काशिबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी न्हाव्याचा संप घडवून आनला.
धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेदमुलक उच्च निचभाव, स्त्रीदास्य,हिंदूधर्म संस्थेतील मुर्तीपुजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी इ. स. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे लोक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना सुरू केली. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राम्हो कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध लिहले. जोतीरावांच्या ऐतिहासिक सामजीक कार्याचे मोल जणून ब्रिटीश सरकारकडून 26 नोव्हेबर 1852 रोजी विश्रामबाग वाडयातील भव्य समारंभात त्यानां शालजोडी अर्पण करण्यात आली. महात्मा जोतीराव फुले हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य

शेतकरी व बहूजन समांत यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आनण्याची क्षमला व त्यांचे दैन्य व दुःख दुर करण्याची क्षमता केवळ शिक्षणात आहे, हे फुले यांनी अचूक हेरले. शेतकऱ्याचा आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती शब्दबध्द केली आहे.

विद्ये विना मती गेली | मती विना निती गेली|

निती विना गती गेली | गती विना वित्त गेले|

वित्त विना शूद्र खचले | एवढा अनर्थ एका अविद्येने केला|

फुले यांनी शेतकऱ्यांचे विदारक अवस्थेचे हे वर्णन डोळ्यांसमोर ठेवून त्यांची स्थीती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली. इ. स. 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कार्यक्रमात महात्मा  फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपारीक पोशाखात अपस्थित राहून शेतकऱ्यांचे गऱ्हाने मांडले. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली.
त्यांच्या या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा हि पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू इ. स. 28 नोव्हेबर 1890 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर या महान कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला.

महात्मा फुले यांनी इ. स. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Mahatma Jyotiba Phule Mahiti in marathi For MPSC Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here