प्रार्थना समाज

0
12

प्रार्थना समाजाची स्थापना –

ब्राह्मो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचद्र सेन हे मुंबईत आले. त्यांनी मुंबईत धर्मसुधारणेच्या व समाज-सुधारणेच्या संदर्भात व्याख्याने देउन लोकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून समाज व धर्मसुधारकांणा प्रेरणा मिळाली. दादोबा पाडूरंग तर्खडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 राेजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात वा. आ. मोडक,न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भंडारकर इ. विचारवंत सहभागी झाले. प्रार्थना समाजाबरोगर सुबोध पत्रिका सुरू केली.

prarthna samaj image mpsckida

प्रार्थना समाजाची तत्त्वे –

  1. परमेश्वर एक आहे. ताे विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तीमान, दयाळू व पवित्र आहे.
  2. सत्य, सदाचार व भक्तीहे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो.
  3. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. मात्र प्रार्थनेमुळे अध्यात्मिक उन्नती होते.
  4. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही.
  5. परमेश्वर अवतार घेत नाही. तसेच परमेश्चराने कोणतेही धर्मग्रंथ लिहीले नाहीत.
  6. सर्व मानसे परमेश्वरााची लेकरे आहोत, म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.

प्रार्थना समाजाची कार्य –

प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करण्याचे काम हाती घेतले. या समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यो प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लिग ही संस्था स्थापन केली. नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी सर्व्हस्ट आ‍ॅफ इंडिया सोसायटी (भारत सेवक समाज) ची स्थापना केली. पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रीयांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here