न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

0
14
एकोनिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या अग्रणी म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना ओळखले जाते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 18 जानेवारी 1842 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात झाले. ते मुंबई येथे पुढील शिक्षणासाठी गेले. कायद्याचा अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहासाचे प्राध्यापक झाले. पुढे न्यायाधिश म्हणून पुण्यात आले. तेथे त्यांचा अनेक सामाजीक संस्थांशी संबंध आला. ते कायदेमंडळाचे सदस्य हि झाले.

महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल माहिती

Nyaymurti mahadev govind rande image mpsckida.in
न्यासमूर्ती रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होत. बुध्दिवादी असल्यामुळे सद्विचाराने वाईट गोष्टींचा त्याग करावा. भूतदया, प्रेम, त्याग, चांगूलपणा आदी गुणांचे अचरण करावे असा त्यांचा आग्रह होता. समाज व्यवस्थेतील दोश दूर झाल्याशिवाय लोकांत नैतिक मूल्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते. 
न्यायमूर्ती रानडे यांनी जातीयता, जातीभेद, उच्च-नीचता, वंशभेद, जन्मभेद सदबुध्दिकडे दुर्लक्ष इत्यादिमुळे भारतीय समाजाची अवनती झाली. समता, न्याय, बंधुभाव यावर आधारीत समाज रचणा होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते. रानडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केले. त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले. मुंबईत त्यांनी एक विधवा विवाह घडवून आनला त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाला अर्थविशास्त्रीय विचारांची जोड दिली. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रात न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या वैचारीक योगदानाने जागृती घडवण्याचे कर्य केले. 16 जानेवारी 1901 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Justice Mahadev Govind Rande Infornathion in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here