आर्य समाज

0
26
आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 20 सप्टेंबर 1824 रोजी गुजरात मधाील मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला. त्यांचे मुळ नाव मुळशंकर करणदास तिवारी असे होते.
aarya samaj dayanand sarswati image

आर्य समाजाची स्थापना –

इ. स. 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. सन्यस्त होउन गुरूप्राप्तीसाठी त्यानी भारतभर भ्रमण केले. वैदिक धर्माचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी इ. स. 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. स्वामींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढिल काळात लाहोर हेच या समाजाचे प्रमुख केंद्र बनले.

आर्य समाजाची तत्त्वे –

  1. परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तीमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालककर्ता आहे.
  2. परमेश्वरच सत्यज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. सृष्टीतील सर्व वस्तू त्याच्या ज्ञात आहेत.
  3. वेद हे इश्वरनिर्मीत आहे. वेद हे सर्व ज्ञानाचे भंडार आहे. परमेश्वराच्या शुध्द स्वरूपाचे ज्ञान वेदात आहेत.
  4. प्रत्यकाने असत्याचा त्याग व सत्याचा स्विकार करावा.
  5. प्रत्येक व्यक्तिने नीतिनियमांना अनुसरून चांगल्या वाईटचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे.
  6. वेद इश्वरप्रमाणित असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम व पवित्र कर्तव्य आहे.
  7. प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुन यांवर आधारीत वर्तवणूक ठेवणे हे प्रत्येाकाचे कार्य आहे.
  8. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे ध्येय असावे.
  9. मानवजातीची भौतिक, अध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्यान साधावे हाच आर्य धर्माचा मुळ उद्देश आहे.
  10. समाज कल्यानासाठी वयक्तिक मतभेद बाजूला सारून प्रयत्न करावेत परुतु वैयक्तिक हितीच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमणे वागण्यास परवाणगी आहे.
 

आर्य समाजाचे कार्य –

आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांना शुध्द करून परत स्वधर्मात घेण्याचे कार्य केले आहे. या समाजाने हिंदू लोकांना स्वधर्मात येण्याचा मार्ग मोकळा केला. दयानंद अ‍ॅंग्लो वैदिक स्कूल ची स्थापना केली व अनेक ठिकाणी शाखाही सुरू केल्या. या धर्माचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हदिव्दार येथे गुरूकुल पध्दतीने धर्मिक शिक्षण देण्यास सुरूवात केली. या समाजाने महाराष्ट्रात  मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये चालवली. बालविवाह पध्दतीला विरोध केला. इ. स. 30 आ‍ॅगष्ट 1883 रोजी स्वामीजींचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here