सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे

0
6

सिमुक :

सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले अाणि आपली सता प्रस्थापित केली. याने  विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले व स्वतःला दक्षिणपथपती असे बिरूद धारण केले.

सातकर्णी प्रथम :

राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादिवर बसला. त्याने नाशिक जिंकून घेतले व 18 वर्षे राज्य केले. राजा कृष्णाच्यानंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची रानी नगनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नानेघाट प्रतिमा मालिकेत कोरल्याने पुरवे मिळतात. हा पराक्रमी मत्सुद्दी राजा होता. हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातिल दोन अश्वमेध यज्ञएक राजासूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळै या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्द प्रयोग न कर्ता सातकर्णी असाच करू लागले. यानंतर सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला. सातकर्णीनंतर शंकाच्या आक्रमापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले.

राजा हाल :

या सातवाहन राजाबद्दन फक्त वाड़मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गथा सप्तशती हा प्राकृत काव्य संग्रह रचल्याची माहिती मिळते.
satvahan vaoshtil rare

गौतमीपुत्र सातकर्णी :

गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीकरण केले. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करतात. त्रिसमुद्रतोय-पितवाहन म्हणजेच ज्यांचे घोडे तिन्ही समुद्राचे पणी प्यायले आहेत. असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री हिने काढले आहेत. कानडी मुलखापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. याने शक, पल्लव, यवन यांचा पराभव केला व क्षत्रप राजा नहपानचा पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला. आईबद्दल आदर असल्याने त्याने स्वतःच्या नावापुढे आईचा अवर्जून उल्लेख केलेला दिसतो.

यज्ञश्री सातकर्णी :

हा सातवाहण घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय. शकांनी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने पुन्हा जिंकून घेतला व आपले साम्राज्य वाढवले. जहाजाचे चित्र असलेल्या त्यांच्या काहि नाण्यांवरून त्याचे अरमार व व्यापारविषयक माहिती मिळते. शकांनी आक्रमणे, सततची युध्दे, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार या कारणामुळे सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here