महापाषाण युग संस्कृती

0
5
महापाषाणयुगीन संस्कृती म्हणजे ‘Megas’ म्हणजे मोठा व ‘Litho’ म्हणजे दगड या दोन शब्दांपासून ‘Megalith’ म्हणजेच महापाषाण हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या देनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबत पुरल्या जातात. व याजागी त्यांची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पध्दतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या या पाषाणच्या विशिष्ठ पध्दतीमुळे या कालखंडाला महापाषाण युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाणयुगाचा काळ हा इ. स. पूर्व 1000 वर्षापुर्वीचा आहे. हि एक लोहयुगीन संस्कृती आहे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाडे तसेच नागपूर जिल्ह्यातील माहूरझरी इ. ठिकाणी यांचे अवशेष प्राप्त होतात.
महाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण युग उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात –
  1. या काळातील मृत्य अवशेष शिला वर्तुळात, खड्यात व शवपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननातून प्राप्त होतात. 
  2. मृताबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे,कुऱ्हाडी अशा हत्यारांचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
  3. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
  4. कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा, इ. प्राण्यांच्या मांसाहाराठी वापर केला जाई.
  5. या काळातील मानव मातीच्या घरात, कच्या विटा व कुडांनी बांधलेल्या घरात राहत असत. 
  6. या काळातील मानव सोने, चांदी, ब्रॉझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
  7. विदर्भातील नैकुड येथे लोह शुध्द करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू हा या काळात मोठया प्रमाणत चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.
  8. या काळतील मानवांनी शेती बरोबरच पशुपालनांनाही महत्व दिले होते.
  9. कुभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला, नक्षिकाम व भाजूून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचे पुरावे मिळतात.
  10. काच, दगडी मणी, नील मणी यांचाही वापर अलंकार म्हणून करत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here