सावित्रीबाई फुले इ. स. 1831 ते 189

0
6
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठा होती. सावित्रीबाईचा विवाह महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला.

महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले

सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिली. महात्मा फुलेनी सुरू केलेल्या  मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणून ओळखले जातात. त्या अशिक्षित होत्या तरीही त्यांनी स्वःता घरी शिकून पुढे शिक्षिकेचे काम केले. सनातनी लोकांना सावित्रीबाईचे हे कृत्य आवडले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. त्यांच्या अंगावर चिखनफेकही केली. सावित्रीबाईनी अपमान, निदानालस्ती सहन करत आपले शिक्षणाचे पवित्र कार्य सुरू ठेवले. अस्पृश्योद्धाराच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. 
महात्मा फुले यांनर बाल हत्या प्रतिबंध गृह आपल्या घरीच सुरू केले. त्या अनाथ मुलांच्या माऊली होत्या. अत्यंत प्रेमाने व मातेच्या वात्सल्याने सावित्रीबाईंनी या मुलांचे संगोपण केले. महात्मा फुले यांच्या सर्व कार्यांत त्यांनी समर्थपणे साथ दिली. सावित्रीबाई या स्वयंप्रकाशित स्त्री होत्या.
महाराष्ट्राच्या स्त्रीविषयक चळवळीतील अग्रगण्य नेेत्या, प्रोढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि आद्यशिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोलाचे आहे. आधी केले मग सांगितले अशा प्रकारचा संदेश समस्त स्त्रीवर्गासाठी आपल्या कर्तव्य संपन्न जिवन कार्यातून दिला. सावित्रीबाईचा जन्म महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करतात. सावित्रीबाई यांनी लिहलेल्या काव्यफुले आणि बावन्नकशी सुबोध रत्नाकर या काव्य संग्रहातून मोळया प्रमाणाती समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे पाळली. अशा या महान कर्तबगार स्त्रीचा मृत्यू प्लेगच्या राेग्यांची देखभाल करताना प्लेगची बाधा झाल्याने 10 मार्च 1897 राेजी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here