जगन्नाथ शंकरशेठ इ. स. 1803 ते 1865

0
6
मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासीक व सांस्कृतीक, आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरसेठ यांचा जन्म 10 फेबु्वारी 1803 रोजी झाला  ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथेल मुरकूटे हे कुटूंब व्यावसायसाठी मुंबईत आले. 

मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरसेठ

मराठी, इग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वात्तेचा वापर समाजसूधारणेसाठी केला. जनकल्यानाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळं इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.
शिक्षणाशिवाय लोकांसा उद्धार होणार नाही हे ओळखून एलफिस्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे निटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सांसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. स्टूडंट लिटररी अ‍ॅण्ड सायटिफीक साेसायटी  च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली. स्त्री शिक्षणबद्दन नानांना फार मोठी आस्था होती. स्त्रीयांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केेले. सरकारने मुंबई सारख्या इलाख्यावर शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रन ठेवण्यासाठी बोर्ड आॅफ एज्युकेशन ची स्थापना केली. त्यांचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले. त्याचेच रुपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले. मुंबई विद्यापिठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आनण्यासाठी दादाभाई नौरांजी यांच्या समवेत त्यांनर बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. नानांनी आपल्या अधिकाराचा आणि सपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यांनी गोरगरीबांना व संस्थेंना आर्थिक मदत केली. ते दानशूर होते. 
सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना मुंब्ईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. आचार्य अत्रे त्यांच्या विषयी म्हणतात, नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांचा मृत्यू 31 जूलै 1865 रोजी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here