आचार्य बाळशास्त्री जांभेकर इ. स. 1812 ते 1846

0
7
नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे समाजाची द्विधा परिस्थिती झाली होती. तो चाचपडत होता. अशा परिर्वतनाच्या काळात व्यापकदृष्टीने समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याचे महत्वाचे कार्य जांभेकरांनी केले. यांचा जन्म रत्नागीरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यातील पोंभुर्ले येथे झाला. सध्या हे ठिकाण सिंधूदूर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यात आहे. त्यांना कुशाग्र बुध्दिमत्तेची देनगी मिळाली होती. संस्कृत, इग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी आदि भाषा आत्मसात केल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्वाच्या पदावर रूज झाले. नंतर ते एल्फिन्स्ट कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. पुढे ते मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियूक्ती केली.

मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जाभेकर

aacharya balshastri jambhekar information
वेगवेगळ्या पदांवर कार्य करत असताना इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपटाचा शोध यांमध्ये ज्ञान संपादन केले. त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतीशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांनी शून्यलब्धी, हिंदूस्थानचा इतिहास, हिंदूस्थानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह, इंग्लडचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिली. या शिवाय ज्ञानेश्वरी पाठभेदांसह संपादन केले.
वृत्तपत्र हे समाज जागृतीचे अत्यंत महत्वाचे साधन आहे. याचा मागोवा घेऊन 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. आद्य समाज सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ञ, जेष्ठ पत्रकार म्हणून जांभेकर यांना ओळखले जाते. त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते. 17 मे 1864 राेजी बवनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here