पंचायत समिती

0
6
त्रिस्तरीय पंचायत राजच्या  आकृतीबंधामधिल पंचायत समिती हा मधला स्तर तसेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुआ म्हणून आहेळखले जातो.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम – 1961 कलम (56) अन्वये प्रत्येक गटास किंवा 2 ते 3 गट मिळवून एक पंचायत समिती असते.
सध्या महाराष्ट्रात 358 तालूके असून 351 पंचायत समित्या आहेत.

पंचायत समितीवर नियंत्रण कोणाचे असते?

 • पंचायत समितीवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण असते, 
 • राज्य शासनाचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते.
 • पंचायत समिती बरखास्तीचा अधिकार राज्य सरकारला आहे

पंचायत समितीची रचना कशी करतात?

 • महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम – 1961 कलम 57 व 58 नुसार करतात.

पंचायत समितीचे सभासद

 • पंचायत समितीचे सभासद ठरविण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. 
 • किमान 12  व कमाल 25
 • वयोमर्यादा 21 वर्ष असावी
 • 1 सदस्य जास्तीत जास्त 20000 लोकसंख्येचा प्रतिनिधी असतो.

पंचायत समिती स्विकृत सदस्य व स्त्रि सदस्य

 • 73 व्या घटना दूरूस्तीनुसार आता स्वीकृत/सहयोगी सदस्य रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले सदस्य हे पंचायत समितीचे सदस्य असतात. पण त्यांना मतरधिकार नसतो.
 • एकूण जागापैकी 50% जागा स्त्रियांसाठी राखीव असून त्यांची प्रौंढ मतदान पध्दतीने होते.
 • महाराष्ट्रात सन 2011 पासून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत 50% अरकक्षण देण्यात आले आहे

पंचायत समितीचे कार्य कोणते?

 • पंचायत समितीकडे 74 विषय सोपविण्यात आले आहेत.
 • विकास योजनांचा आराखडा तयार करणे.
 • जिल्हा परिषदेने सोपविलेली कामे पार पाडणे.
 • अंदाज पत्रक तयार करणे.
 • योजनांची अंमलबजावणी करणे.
 • गट अनुदानातून विकास योजना हाती घेउन मंजूरी देणे.
 • योजना कामांवर देखरेख करणे.
 • पाझर तलावांच्या कामांना मंजूरी देणे.
 • जनसिंचन सोयी उपलब्ध करून देणे.
 • पशुधनाचा विकास करणे.
 • सभापती व उप सभापती यांची एका वर्षात 30 दिवसांपेक्षा जास्त पण 90 दिवसापेक्षा कमी एवढी रजा मुजूर करणे
 • 90 दिवसापेक्षा जास्त दिवसांची रजा जिल्हा परिषदची स्थायी समिती मंजूर करते.

पंचायत समितीवर नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • पंचायती समितीला जिल्हा परिषद अर्थ पुरवठा करते.
 • पंचायत प्रशासनात गट याचा अर्थ – तहसिल 
 • पंचायत समितीचे आर्थिक वर्ष सूरू – 1 एप्रिल
 • जिल्हा परिषदेची छोटी प्रतिकृती – पंचायत समिती
 • पंचायत समितीची पहिली बैठक बोलवतो – प्रांत अधिकारी / जिल्हाधिकारी
 • पंचायत समितीची समिती आपले अंदाजपत्रक मुजुरीसाठी पाठविते – जिल्हा परिषदेकडे
 • पंचायत समितीची हिशेब तपासनी – स्थानिक निधी लेखापाल 
 • ग्रामपंचायतीच्या अंदाज पत्रकास अंतिम मंजूरी देते – पंचायत समिती 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here