शिक्षक भरतीचा ‍आ‍ॅनलाईन अर्ज कसा करावा ?

0
8

पवित्र पोर्टल वर शिक्षक भरतीचा आ‍ॅनलाईन अर्ज कसा करावा ?

शिक्षक भियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TET) परिक्षेसाठी आपण जी माहिती भरली आहे ती माहिती पवित्र प्रणालीमध्ये घ्येण्यात आलेली आहे. ती भरलेली माहिती पडताळून व इतर अधिकची माहिती घेतली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवाराने लॉगीन करायचे आहे.
वरील वेळापत्रकानुसार दिलेल्या वेळापत्रकाणुसार उमेदवारांनी TAIT नंबर नुसार अर्ज करता येतील.
सर्वप्रथम Applicant Details या बटनावर क्लिक केल्यावर दिसून येणारा Personal Details या Sub-Tab वर क्लिक करावे.
Personal Details : या भागात आपणास आपण शिक्षक भियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TET) परिक्षेसाठी भरलेली माहिती घेण्यात आलेली आहे. तुमचे नाव जन्मतारीख इत्यादी माहिती पडताळून घ्यावी.

पवित्र पोर्टल वरील न बदलता येणारी माहिती.

 1. Applicant Name
 2. Gender
 3. Date of Birth
 4. Marks
 5. Mobile No
वरील माहितीमध्ये काही बदल अथवा दुरूस्ती करायची असल्यास शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन मधूनच दुरूस्त करता येईल.
आपण ज्या शैक्षणिक शाळेसाठी/संस्थेसाठी/ जि .प /मनपा अर्ज करणार आहेत. त्यावेळी आपणास जास्तीत 20 शाळा राज्यभरातील निवडण्याची संधी उपलब्ध असणार आहे अशा पध्दतीने अर्ज भरून Submit करावा.

पवित्र पोर्टलवर फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे ?

पवित्र पोर्टल प्रणालीत शासन निर्णय 12 डिसेंबर 17 नुसार काही कागदपत्रे तुम्हाला Attach करावी लागतील.  सर्व कागदपत्रे 150kb पेक्षा कमी  Scan करून ठेवावीत.
 1. शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी-12वी)
 2. शाळा सोडल्याचा दाखला
 3. शिक्षक पात्रता परिक्षा गुणपत्रक
 4. अधिवास/डोमेसाईल
 5. जात प्रमाणपत्र/ वैधता प्रमाणपत्र
 6. व्यावसाईक प्रमाणपत्र मान्यताप्रप्त संस्थेचे (डी.एड/बी.एड)
 7. महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 
 8. MS-CIT किंवा CCC हे प्रमाणपत्र
 9. अपंगासाठी आवश्यक ते वैधता प्रमाणपत्र
(संदर्भ महाराष्ट्र शासन निर्णय 12/12/2017 शालेय शिक्षण विभाग)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here